जलदिंडीतून दिला पाणीबचतीचा संदेश तथा स्वच्छ व सुंदर कचरामुक्त मोशी अभियान

५ वर्षांपूर्वी मोशी भागात मुख्य व अंतर्गत रस्त्यावर तसेच जागोजागी कचराकुंडी, कचऱ्याचे ढीग अवास्तव पसरलेले दिसत होते. सध्यस्थितीत हे चित्र पुर्णपणे बदलले असून विद्रुपिकरण दुर झाले आहे. सध्या घरोघरी कचरा बेचक गाडी कचरा गोळा करण्यासाठी जात आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असुन कचरामुक्त मोशी झाली आहे. पूर्व स्थितीचे चित्र Read more

कोरड्या घशाची जाणली तहान… मोफत पाणीटँकरचे चालविले अभियान…!

कोरड्या घशाची जाणली तहान मोफत पाणीटँकरचे चालविले अभियान दुष्काळी परिस्थितीमुळे मोशी परिसराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत होती. लोकांचे पाण्यावाचून अतोनात हाल होत होते. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी मोशी परिसरात ६८ दिवस तीन टँकरने मोफत पाणीपुरवठा केला.

गणेश विसर्जनासाठी उभारली सुसज्ज यंत्रणा

गणेश विसर्जनासाठी उभारली सुसज्ज यंत्रणा गणेश उत्सव विसर्जन काळात सुरुवातीला प्रचंड गलथानपणा होता. त्यानंतर उत्तम व्यवस्थापन करुन इंद्रायणी घाटावर सी.सी. टिव्ही (C.C.T.V. Camera), लाकडाचे रँले, निर्माल्य कुंड, पोलिस व फायर ब्रिगेड यंत्रणा अशा सर्व सुविधायुक्त मोशी इंद्रायणी विसर्जन घाट तयार करण्यात आला आहे. डुडुळगांव दत्तनगर रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी डुडुळगांव Read more

चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे आयोजन

विविध उपक्रमाच्या माध्यमातुन समाज कार्यात अग्रेसर नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना रजई वाटप, आनंदग्राम सोसायटी येथे फळवाटप, पांजरपोळ अंध शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप करण्यात आले. नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये श्री. सागर कारंडे, श्री. भाऊ कदम, श्री. भारत Read more

दुष्काळग्रस्तांना १ लाखांचा मदतनिधी

२०१५ मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.. सामाजिक बांधिलकी म्हणून नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट युवा फाऊंडेशनच्या वतीने दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांचा मदतनिधी देण्यात आला.

॥ वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें ॥

॥ वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें ॥ भौतिक सुखासाठी माणसाने झाडे तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्याचा परिणाम आता सर्वच जिवांना बसू लागला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी नगरसेवक धनंजय आल्हाट आपल्या मित्र परिवार, कार्यकर्त्यांना, नागरिकांना बरोबर घेऊन श्रीनागेश्वर विद्यालय व परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवित असतात. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आयुक्त श्रीकर परदेशी, गटनेता Read more

धार्मिक कार्यक्रम एक जिवन

धार्मिक कार्यक्रम एक जिवन…अमरवीर ज्योती तरुण मंडळाच्या माध्यमातून मोशी येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाच्या माध्यमातून गेली २१ वर्षे समाजप्रबोधनाचे काम केले जात असून दरवर्षी शिवजयंती, श्री संत सावता माळी महाराज पुण्यतिथी, आण्णाभाऊ साठे जयंती, डॉ। बाबासाहेब आंबेडकर जयंती, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी, रमजान ‘ईदच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

कसा सुटला बफरझोन? मोशी कचरा डेपोच्या ‘बफर झोन’ प्रश्नी धनंजय आल्हाट यांनी आंदोलन उभारले.

कचराडेपो पाहणी करताना महाराष्ट्रराज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका अधिकारी खासदार शिवाजीराव आढळराव पाटिल व नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट नागरिकांना एकत्र करून २०१० मध्ये तत्कालीन सहकार आयुक्त श्रीमती नाईक यांच्याकडे हरकती नोंदविल्या. • मोशी कचरा डेपोच्या ‘बफर झोन’ प्रश्नी २००८ मध्ये धनंजय आल्हाट यांनी पहिले आंदोलन उभारले. त्यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, Read more

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली जीवन चरित्र सोहळा

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मा. श्री. धनंजय आल्हाट आणि मित्र परिवाराच्या वतीने ह. भ. प. गणेश महाराज वाघमारे यांच्या ‘कैवल्याचा पुतळा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सलग ५ दिवस हा कार्यक्रम मोशी आमराई परिसरात घेण्यात आला.

नागरी समस्यांची घेण्या दखल महापालिका आयुक्तांना केले मोशीत दाखल

आपल्या भागातील नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांचे जीवनमान सुधारावे, यासाठी धनंजयभाऊ आल्हाट हे नेहमीच दक्ष राहिले आहेत. केवळ समाजविकास हा एकच ध्यास घेऊन त्यांनी विविध समस्या महापालिकेत धडाडीने मांडल्या आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत असलेले श्रीकर परदेशी, राजीव जाधव, दिनेश वाघमारे या तीन Read more