मनोगत
आयुष्यात पहिल्या पासुनच काहीतरी वेगळ करण्याची मनामध्ये जिद्ध होती. श्री क्षेत्र देहू व आळंदी यांच्या मधे वसलेल्या मोशी गावामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला. कुटुंबाला पहिल्यापासून अध्यात्माचा वारसा असल्यामुळे निस्वार्थपणे समाजात समाजासाठी काम करण्याची गोडी लागली. शिक्षण पूर्ण करून व्यवसायात काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे. याच कालावधीत हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व भाषणाचा चाहता झालो. यावेळी शिवसेना हे वारे वेगळेच वारे वाहत होते. त्या वेळी अनेक शिवसेना
नेत्यांच्या सानिध्यात आल्याने व शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना’ या चार अक्षरांशी जोडलो गेलो. त्यानंतर व्यवसायात प्रगती करत असताना हिंदू ह्रदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शांत बसू देत नव्हते. समाजविकासाचे ध्येय उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी निघालेल्या या ध्येयवेड्या शिवसेनेत एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून मी सामील झालो. शिवबंध हातात बांधले आणि शपथ घेतली लोककल्याणाची. मोशी गाव कायमच विकासापासून वंचित ठेवण्याचे राजकारण पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केले, त्यामुळे रस्ते, वीज, ड्रेनेज, पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधाही नागरिकांना मिळत नव्हत्या. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वसामान्यांचे खंबीर नेतृत्व बनून २००७ पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत उतरलो. या निवडणुकीत पराभवाला सामारे जावे लागले असले तरी हार मानली नाही. अपयशाने खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून पुन्हा नव्या जोमाने कामाला प्रारंभ केला. या काळात सत्ता नसतानाही प्रभागात भरीव काम उभे केले. सर्व समाजघटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यात यश मिळाले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मदतकार्य सुरू केले. याचा परिणाम म्हणजे २०१२ च्या निवडणुकीत जनतेनं विजयाची माळ माझ्या गळ्यात घातली.
रस्त्यांचा विकास, पाणीपुरवठा पाईपलाईन टाकणे, वीजवाहिन्या भूमिगत करणे, ड्रेनेज सुविधा तयार करणे, आरोग्याच्या सुविधा, महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, विद्यार्थी, गरजूंना मदत, तसेच अनेक वर्षांपासून भिजत पडलेला बफर झोन-कचरा डेपोचा प्रश्न जनआंदोलन उभारून सोडविला. शासनदरबारी अनधिकृत असणारी घरे नियमित करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. याचा फायदा शेकडो कुटुंबांना झाला. अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलने, मोर्चे, उपोषणे केली आणि लोकांना न्याय मिळवून दिला. यासाठी शिवसेनेच्या नेत्यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य लाभले.
राजकारणाचे एक पर्व संपले असले तरी विकासाची प्रक्रिया अखंड चालणारी आहे. आता विकासाचे दुसरे पर्व सुरू करत आहे, जे पहिल्यापेक्षा अधिक गतिमान असेल. तुमचा माणूस म्हणून मी सदैव आपल्या सेवेस तत्पर असेनच पण हे सर्व करण्यासाठी गरज आहे ती तुमच्या पाठबळाची, लोकविकासाचे आता पुन्हा एकदा भगवा खांद्यावर घेऊन परेमेश्वराच्या आशिर्वादाने व आपल्या सारख्या अन्यायाशी लढा देणा-यांच्या सोबतीने, जन सामान्यांच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी तयार आहे.
फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे……….! जय महाराष्ट्र……!
आपलाच,
श्री. धनंजय भाऊ आल्हाट
( मा. नगरसेवक, पिंपरी-चिंचवड मनपा / सदस्य, स्थायी समिती / सदस्य, जिल्हा नियोजन समिती )



























