धार्मिक कार्यक्रम एक जिवन
धार्मिक कार्यक्रम एक जिवन…अमरवीर ज्योती तरुण मंडळाच्या माध्यमातून मोशी येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाच्या माध्यमातून गेली २१ वर्षे समाजप्रबोधनाचे काम केले जात असून दरवर्षी शिवजयंती, श्री संत सावता माळी महाराज पुण्यतिथी, आण्णाभाऊ साठे जयंती, डॉ। बाबासाहेब आंबेडकर जयंती, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी, रमजान ‘ईदच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
नागेश्वर महाराज भंडारा जागेसाठी यशस्वी पाठपुरावा
मोशी गावचे ग्रामदैवत म्हणजे श्री नागेश्वर महाराज. भंडाऱ्याचा उत्सव अनेक वर्षांपासून गावच्या मध्यभागी असलेल्या बस टर्मिनल या जागेवर होत असतो. या जागेवरील बस टर्मिनलचे आरक्षण रद्द करून त्यावर खेळाच्या मैदानासाठीचे आरक्षण टाकल्यास मुलांना खेळण्यासाठी तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी ते वापरता येणे शक्य आहे. यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. महापालिकेतील जकात Read more
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली जीवन चरित्र सोहळा
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मा. श्री. धनंजय आल्हाट आणि मित्र परिवाराच्या वतीने ह. भ. प. गणेश महाराज वाघमारे यांच्या ‘कैवल्याचा पुतळा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सलग ५ दिवस हा कार्यक्रम मोशी आमराई परिसरात घेण्यात आला.
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा अस्थिकलश मोशी येथे आनण्यास आला. अखेरच्या दर्शनासाठी शिवसैनिकांनी केलेली गर्दी.




