जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

आज दि. ०८/०३/२०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त  श्री.धनंजय भाऊ आल्हाट युवा फाउंडेशन व धनश्री हॉस्पिटल, मोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर ह्या उपक्रमास राबविण्यात आला व सदर उपक्रमास  अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला..

ग्रामदैवत श्री. नागेश्वर महाराज यात्रा उत्सव २०२५

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री. नागेश्वर महाराजांचा यात्रा  उत्सवानिमित्त शुक्रवारी  दि -२८-०२-२०२५ रोजी सस्नेह भोजनाचे आयोजन केले होते. तरी सदर कार्यक्रमास अतिशय छान असा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या माझ्या सर्व अतिथी रुपी नागरिकांचे  मनस्वी आभार. आपल्यातील स्नेह जिव्हाळा असाच यापुढेही राहो अशी अपेक्षा करत

श्री जगद्‌गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोतस्वी ३७५ वा वैकुंठगमन सोहळा निमित्त रु १,०००००/- देणगी

|| राम कृष्ण हरी || 🙏 श्री जगद्‌गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोतस्वी ३७५ वा वैकुंठगमन सोहळा निमित्त अखंड हरीनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा या कार्यक्रमानिमित्त रु १,००,०००/- देणगी देऊन खारीचा वाटा उचल्याचे समाधान लाभले.  

76 वा प्रजासत्ताक दिन

76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मोशी परिसरातील विविध सोसायटी व शाळेमध्ये ध्वजारोहण मोठ्या उत्साहातकरण्यात आला तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ही खूप छान पद्धतीने पार पडले. जय हिंद जय भारत 🇮🇳

वाय जंक्शन चौक ते कुदळेवस्तीला जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.

मा.आयुक्तांच्या आदेशनुसार काल मी जी परिस्थिती रस्त्याची दाखवली होती त्याची दखल घेत कामाला सुरुवात केली त्याबद्दल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.

पी.एम.पी.एम.एल प्रशासनास निवेदन देऊन थेट बससेवा सुरू

#प्रयत्नांना अखेर आज यश आले.अनेक दिवसांपासून मोशीमधून पुणे शहरात जाण्यासाठी थेट बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिक,महिलावर्ग यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत होते.पी.एम.पी.एम.एल प्रशासनास निवेदन देऊन थेट बससेवा सुरू करण्याची विनंती केली.आज दि.२४/१२/२०२२ रोजी सकाळी ८:०० वा. विधीवत पुजा करुन बस मार्गस्थ केली. यावेळी मा.नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट, नगरसेवक वसंतशेठ बोराटे, Read more