सार्वजनिक गणेश उत्सव 2024

गणपती बाप्पा मोरया..मंगलमुर्ती मोरया..! मोशी ,डुडुळगाव, शिवाजीवाडी  परिसरातील विविध गणेश मंडळे यांना सदिच्छा भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले, सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

वाय जंक्शन चौक ते कुदळेवस्तीला जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.

मा.आयुक्तांच्या आदेशनुसार काल मी जी परिस्थिती रस्त्याची दाखवली होती त्याची दखल घेत कामाला सुरुवात केली त्याबद्दल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.

श्री नागेश्वर विद्यालय व्यवस्थापन समिती बैठक.

श्री नागेश्वर विद्यालय.. व्यवस्थापन समिती बैठक पार पडली यामध्ये पर्यायी जागा, पोषण आहार, निकालाची टक्केवारी, इतर विषयांवर चर्चा झाली.

मोरया मेडिकल च्या उदघाटन समारंभ.

श्री.राहुल जाधव, श्री.सागर खरमते यांच्यानवीन मोरया मेडिकल च्या उदघाटन प्रसंगी उपस्थिती. यावेळी श्री.अक्षय गायकवाड  श्री.धनंजय गावली इतर मित्र परिवार उपस्थित होते.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम नगर (बुद्ध विहारात) येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.