मनोगत

आयुष्यात पहिल्या पासुनच काहीतरी वेगळ करण्याची मनामध्ये जिद्ध होती. श्री क्षेत्र देहू व आळंदी यांच्या मधे वसलेल्या मोशी गावामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला. कुटुंबाला पहिल्यापासून अध्यात्माचा वारसा असल्यामुळे निस्वार्थपणे समाजात समाजासाठी काम करण्याची गोडी लागली. शिक्षण पूर्ण करून व्यवसायात काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे. याच कालावधीत हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व भाषणाचा चाहता झालो. यावेळी शिवसेना हे वारे वेगळेच वारे वाहत होते. त्या वेळी अनेक शिवसेना नेत्यांच्या सानिध्यात आल्याने व शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना’ या चार अक्षरांशी जोडलो गेलो. त्यानंतर व्यवसायात प्रगती करत असताना हिंदू ह्रदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शांत बसू देत नव्हते. समाजविकासाचे ध्येय उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी निघालेल्या या ध्येयवेड्या शिवसेनेत एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून मी सामील झालो. शिवबंध हातात बांधले आणि शपथ घेतली लोककल्याणाची.

मोशी गाव कायमच विकासापासून वंचित ठेवण्याचे राजकारण पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केले, त्यामुळे रस्ते, वीज, ड्रेनेज, पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधाही नागरिकांना मिळत नव्हत्या. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वसामान्यांचे खंबीर नेतृत्व बनून २००७ पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत उतरलो. या निवडणुकीत पराभवाला सामारे जावे लागले असले तरी हार मानली नाही. अपयशाने खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून पुन्हा नव्या जोमाने कामाला प्रारंभ केला. या काळात सत्ता नसतानाही प्रभागात भरीव काम उभे केले. सर्व समाजघटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यात यश मिळाले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मदतकार्य सुरू केले. याचा परिणाम म्हणजे २०१२ च्या निवडणुकीत जनतेनं विजयाची माळ माझ्या गळ्यात घातली.

रस्त्यांचा विकास, पाणीपुरवठा पाईपलाईन टाकणे, वीजवाहिन्या भूमिगत करणे, ड्रेनेज सुविधा तयार करणे, आरोग्याच्या सुविधा, महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, विद्यार्थी, गरजूंना मदत, तसेच अनेक वर्षांपासून भिजत पडलेला बफर झोन-कचरा डेपोचा प्रश्न जनआंदोलन उभारून सोडविला. शासनदरबारी अनधिकृत असणारी घरे नियमित करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. याचा फायदा शेकडो कुटुंबांना झाला. अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलने, मोर्चे, उपोषणे केली आणि लोकांना न्याय मिळवून दिला. यासाठी शिवसेनेच्या नेत्यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य लाभले.

राजकारणाचे एक पर्व संपले असले तरी विकासाची प्रक्रिया अखंड चालणारी आहे. आता विकासाचे दुसरे पर्व सुरू करत आहे, जे पहिल्यापेक्षा अधिक गतिमान असेल. तुमचा माणूस म्हणून मी सदैव आपल्या सेवेस तत्पर असेनच पण हे सर्व करण्यासाठी गरज आहे ती तुमच्या पाठबळाची, लोकविकासाचे आता पुन्हा एकदा भगवा खांद्यावर घेऊन परेमेश्वराच्या आशिर्वादाने व आपल्या सारख्या अन्यायाशी लढा देणा-यांच्या सोबतीने, जन सामान्यांच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी तयार आहे.

फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे……….! जय महाराष्ट्र……!

आपलाच,
श्री. धनंजय भाऊ आल्हाट
( मा. नगरसेवक, पिंपरी-चिंचवड मनपा  /
सदस्य, स्थायी समिती / सदस्य, जिल्हा नियोजन समिती )

समाजकारण

80%

राजकारण

20%

परिचय

  • नाव : श्री.धनंजय मुरलीधर आल्हाट  
  • जन्म : १७ ऑक्टोबर १९७१
  • पत्ता : मोशी, पुणे 
  • शिक्षण : बी.कॉम.
  • व्यवसाय : मिडिया व्यवसायिक 
  • आवड : समाजसेवा
  • मा. नगरसेवक : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ( प्रभाग क्र.४ )
  • मा. सदस्य, स्थायी समिती 
  • मा. सदस्य, जिल्हा नियोजन समिती
  • संस्थापक अध्यक्ष : हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था  
  • विधानसभा प्रमुख : शिवसेना, भोसरी 
  • चेअरमन/संचालक : जय हनुमान केबल नेटवर्क 

सांस्कृतिक

  • १९९३ मध्ये अमरवीर ज्योती तरुण मंडळाची स्थापना. मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव, सामुदायिक गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात. या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन
  • सन १९९४ साली लातुर येथे भुकंपग्रस्त गावामध्ये मदतनीथी फेरी, भुकंपग्रस्त पिडीत हरेगाव, सास्तूर, निंबाळा, किल्लारी याठीकाणी चार दिवस प्रत्यक्ष पणे मदत कार्य करून गृह उपयोगी वस्तू काढण्यास मदत व भूकंप पिडीतांना आर्थीक मदत करण्यात आली.

 सामाजिक व धार्मिक

  • महात्मा फुले युवा मंचच्या माध्यमातून शिवजयंती महात्मा फुले पुण्यतिथी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. यानिमित्त महाराष्ट्राची लोकधारा, ही दौलत महाराष्ट्राची, मराठी पाऊल पडती पुढे अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
  • शिवनेरी ते मोशी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन तसेच शिवचरित्र ग्रंथाचे वाटप, मोशी गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज भंडारा सोहळा व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
  •  छत्रपती शिवाजी महाराज तसेच महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यानांचे आयोजन
  •  १९९८ पासून दीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनी मोशी ते वद् वीरज्योतीच्या नियोजनाची सुरुवात संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त प्रवचन, ह.भ.प. निवृत्ती महाराज, ह.भ.प. रामायणाचार्य ढोक महाराज, ह.भ.प. बाबा महाराज इंगळे, ह.भ.प. वृषालीताई गायकवाड, ह.भ.प. किसन महाराज साखरे, ह.भ.प. पृथ्वीमहाराज जाधव यांची प्रवचन व कीर्तन सेवेचे नियोजन
  • मिलींद एकबोटे, स्व. निळूभाऊ फुले अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, शिवचरित्र व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील, दलित साहीत्यीक दि. बा. बागुल (सर), दुर्गतज्ञ आ, पांडुरंग बलकवडे, शारदाताई मुंडे (मी सावित्रीबाई बोलतेय…) आदी व्याख्यानाचे आयोजन
  • उमाजी नाईक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन पालखी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना फळांचे वाटप
  • वाढदिवसानिमित्त आनंद ग्राम कुठरोग रुग्णांना दरवर्षी फळांचे वाटप
  • मोशीतील सैनिकी जवानांच्या माता-पित्यांचा देशपती’ पुरस्कार देऊन सन्मान
  • आदर्श शिक्षकांचा यथोचित गौरव, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
  • साथीच्या आजाराविषयी जनजागृती मोहीम राबविली जाते

      . पर्यावरण व आरोग्य 

      • इंद्रायणी नदीकाठी वृक्षारोपण, नसेच विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप
      • संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त ३ हजार ग्रामस्थांना रोपांचे वाटप 
      • वाढदिवसानिमित्त इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन.
      • १९९४ मध्ये मोशी येथे प्रथमच आरोग्य शिबिराचे आयोजन. मोफत आरोग्य तपासणी व १२०० रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असून रक्तदान शिबिराचे वेळोवेळी नियोजन करण्यात आले. 

      शासकीय योजना:

      •  माहिती अधिकार कायद्याचा प्रसार करण्यासाठी ५०० नागरिकांचे एकदिवसीय शिबिर घेतले. आधार कार्ड योजनेचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी तीन महिने सक्षमपणे नियोजन केले
      •  १२०० नागरिकांना मोफत रेशनकार्ड व पॅनकार्ड सुविधा मिळवून दिली.

      सहकार:

      • २००४ साली हिंदविजय पतसंस्थेची स्थापना करून तरुणांना व नागरिकांना व्यवसायासाठी मदत करण्यात आली असुन ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

        विकासासाठी आंदोलन व उपोषणे :

        • कचरा डेपो व बफर झोनसाठी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील, ह.भ.प. बंड्यातात्या कराडकर, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमवेत सर्वात पहिल्यांदा जनआंदोलन केले.
        • बफर झोनची मर्यादा ५०० मीटरवरून १०० मीटरवर आणण्यात यश . मोशीचा कचरा डेपो स्थलांतरित करण्यासाठी आंदोलन छेडले.
        • लोकशाही मार्गाने आंदोलन करून लाचखोर तलाक्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले.
        • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकास पाठिंबा देण्यासाठी भव्य मोर्चा.
        • काढला मोशी बाजार समितीने बांधलेल्या गाळ्यांमध्ये स्थानिक शेतकन्यांना गाळे उपलब्ध करून द्यावेत, तसेच इमारतीला प्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांचे नाव द्यावे यासाठी आंदोलन केले.
        • स्व. अंकुशराव लांडगे यांच्या नेतृत्वाखाली नागरी सुविधांकरिता अनेकवेळा महापालिकेवर जनमोर्चा कावला सौ. सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील समस्यांबाबत नागरिकांचा मोर्चा काढला.
        • शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पाटील, मिलिंद एकबोटे यांच्या उपोषणास पाठिंबा.
        • सहभाग इंद्रायणी नदी स्वच्छ व्हावी याकरिता … कराडकर यांच्या उपोषणास पाठिंबा व सहभाग.
        • मिनीट एकबोटे यांच्या संभाजी ब्रिगेड  विरोधी आंदोलन व काळुबाई यामधील मृत भावीकांना शासनाने मदत करावी यासाठी आंदोलनामध्ये प्रखर असा सहभाग निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराविरोधात प्रखर आंदोलन छेडले. परिणामी जुना ठेका रद्द करून इस्कॉन संस्थेचा पोषक आहार सुरु.
        • गॅस आंदोलनाने गॅस सेवा सुरळीत झाली, तसेच वितरकाने घेतलेले आगाऊ पैसे परत केले.
        •  प्रखर आंदोलनाने सफाई कामगारांना एक हजार पगारवाढ व बोनस मिळवून दिला.
        • मोशी खाण क्षेत्रांमध्ये खाण मालकांनी बेकायदा ब्लास्टिंग करत असल्याने शेती, घरांचे नुकसान झाले. याप्रकरणी जिल्हाधिकारी व भूप्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार करून हा प्रकार थांबविला.

          सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक

          • शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने शाहीर देविदास माळी, तसेच प्रा. गुलाबराव वळसे पाटील, मराठी पाऊल पडते पुढे इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
          •  खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह. भ. प. गणेश महाराज वाघमारे यांचा कैवल्याचा पुतळा हा ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला.
          •  कार्तिकी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना व भाविकांना फळवाटप, अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन मागील चार वर्षांपासून केले जात आहे.
          • शिवसेना सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. अमोल कोल्हे प्रस्तुत ‘भगवा’ या कार्यक्रमाचे आयोजन
          • करण्यात आले होते. यामध्ये ७००० शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शविली.
          •  नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांतर्गत भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, गणेश भारतपुरेसह गायक स्वप्नील बांदोडकर, रोहित राऊत, शांताबाई फेम संजय लोंढे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ५००० लोकांनी उपस्थिती दर्शविली. 
          • वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपये दुष्काळग्रस्त निधी मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच सफाई कामगारांना दरवर्षी दिवाळीनिमित रजईचे वाटप करण्यात येते.

          पाणी समस्या

          • उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाईच्या काळात शहरात दोन दिवसांनी पाणी सोडण्यात येत होते, त्या काळात नागरिकांना पाणीटंचाई भासू नये म्हणून नगरसेवक पनंजयभाऊ आल्हाट यांनी दोन टँकरनी सलग ६८ दिवस मोफत पाणीपुरवठा केला. त्यामुळे भीषण पाणीटंचाईपासून मोशी भागातील रहिवाशांची सुटका झाली.

          मुरुम चोरीला पायबंद

          •  मोशी प्राधिकरणातील मुरूम चोरीसंदर्भात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महसूल अधिकारी व पोलिस अधिकारी यांना बरोबर घेऊन मुरूम चोरी ठिकाणचा पाहणी दौरा केला. त्यामुळे मुरुम चोरी करण्यांवर कारवाई करण्यात आली असून मुरुम चोरी थांबली आहे.

          इंद्रायणी केली जलपर्णीमुक्त:

          • पवित्र जल म्हणून प्राशन करणाऱ्या इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णीचे साम्राज्य पसरले होते. याची दखल घेत धनंजयभाऊ आल्हाट यांनी प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करत इंद्रायणी जलपर्णी मुक्त करण्यासाठी सभागृहात जलपर्णी परिधान करत लक्षवेधी आंदोलन केले. तसेच जलपर्णी मुक्त करण्यासाठी आयुक्तांचा वेळोवेळी पाहणी दौराही आयोजित केला. अखेर इंद्रायणी नदी जलपर्णीमुक्त केल्याचे दिसून येत आहे.
          • गणेशोत्सव काळात पुणे शहर पोलीस दलास केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल पोलीस आयुक्तांकडून नगरसेवक धनंजय आल्हाट यांचा सत्कार करण्यात आला.
          • संपूर्ण प्रभागात २३३ रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले असून विकास आराखाड्यातील रस्त्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गी आहे.
          •  स्थापत्य: संपूर्ण प्रभागात स्थापत्य विभागा मार्फत ४२,२१,४७,३६५ रुपये रकमेची कामे करण्यात आली.
          • ड्रेनेज : संपूर्ण भागात ड्रेनेजसाठी ३१४४५.०५ लांबी मी.ची मलनि:सारण नलीका टाकण्यात आली असुन ६,९२,५४,२१८ रुपये खर्च करण्यात आला.
          • पाणीपुरवठा: मोशी भागात पाणीपुरवठा अंतर्गत ७,२२,७८, १३२ रुपये खर्च करुन परिसरात पाणीपुरवठा व्यवस्था करून देण्यात आली..
          • विद्युत: मोशी भागात विद्युत विभागा मार्फत २,०४, १९.०८९ रुपये खर्च करण्यात आला.
          •  मोशी चौक सुशोभीकरण व भाजी मंडईचे काम गतीने सुरु असून लवकरच पूर्ण होईल मोशी भागात अनेक दिवसांपासून खेळाचे मैदान व उद्यानाची गैरसोय होती नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा करत खेळाचे मैदान व उद्यानाचे भुमीपुजन केले असून काम जलद गतीने सुरू आहे. थोडयाच दिवसांत उद्यान व खेळाचे मैदान लोकार्पण होईल, विकास आराखड्यातील १८ मी. २४ मी. चे एकुण २ रस्ते विकसीत करण्याचे काम सुरु आहे.
          • मोशी व डुडुळगांव स्मशानभुमी येथे पत्राशेड उभारणे, प्रवचन बैठक व्यवस्था व इतर सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
          • आदर्शनगर, खान्देशनगर, तापकीरनगर, गंधर्वनगरी, सहयोग कॉलनी भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली असून त्या भागात स्वखर्चाने बसशेड उभारण्यात आले आहे.
          • निवडणूक झाल्यानंतर सुरुवातीला आदर्शनगर, खान्देशनगर, फातिमानगर, संत ज्ञानेश्वरनगर याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या. अशावेळी गोधनंजयआल्हाट यांनी वने व नागरिकांच्या माध्यमातून त्या भागातील मूलभूत विकासकामे मार्गी लावली.
          • नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी मोशी प्रभागातील महीलांना मोफत शिलाई मशीन वाटप केले असून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. तरोध संजयगांधी निराधार योजनेअंतर्गत महीलांना अनुदान उपलब्ध करून दिले आहे.