शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. ती कारवाई थांबविण्यात यावी, तसेच नियमित होऊ शकणाऱ्या बांधकामांबाबत त्वरित निर्णय घेऊन बांधकामधारकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात केली.
राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ
शिंदे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दीड हजार चौरस फुटांपर्यंत बांधकाम असलेल्या घरांना कोणत्याही प्रकारच्या बांधकाम परवानगीची गरज नाही, त्या बांधकामांना संरक्षण मिळावे, रेडझोनच्या सीमेवरील बांधकामांना
रेडझोनच्या हद्दीतून वगळण्यात यावे काही प्रमाणात दंड भरून नियमित केले जाऊ शकतील, अशा बांधकामांवर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनातून केली आहे अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नासंदर्भात महापालिकेचे नवीन आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येईल संबंधित नागरिकांना न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिले.

0 Comments