कोरोना पेशंटचे 1,11,810 रुपये बिल कमी करण्यात आले यश*
आज दिनांक 06/10/2020
वाढीव बिलासंबंधी तक्रार करण्यासाठी आपण केलेल्या आवाहनानुसार एका कुटुंबातील 5 पेशंटचे बिल वाढीव आल्या संबंधी तक्रार आली..
यावेळी मा. नगरसेवक श्री. धनंजय भाऊ आल्हाट, भोसरी विधानसभा प्रमुख शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली, युवासेनेचे अँड. कुणाल किसनराव महाराज तापकीर आणि शिवसेनेचे पदाधिकारी सदर हॉस्पिटल मध्ये पोहोचले,
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ऑडिटर आल्यानंतर त्यांना बिल वाढीव आकरल्याचे निदर्शनास आणुन दिले.
*एकुण बिलापैकी 1,11,810 रुपये बिल कमी करण्यात आले.. पेशंट च्या नातेवाईकांना वाढीव रक्क्मेचा धनादेश हॉस्पिटल प्रशासनाकडून परत करण्यात आला…*
*पिंपरी चिंचवड हद्दितील सर्व कोविड हॉस्पिटल ला विनंती आहे की तुम्ही शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार बिलांची आकारणी करा.. नाहितर आम्हाला शिवसनेच्या वतीने याची दखल घ्यावी लागेल..*

0 Comments