पर्यावरणाची करुनी पाहणी

इंद्रायणी नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णी वनस्पतीमुळे जलप्रदूषण वाढले होते. महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनी स्वतःच्या गळ्यात जलपर्णीची माळ घालून प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. जलपर्णीमुळे नदीपात्रात गाळ साठला होता. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत होती. नदीकाठच्या लोकवस्तीमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. इंद्रायणी नदीपात्राला पडलेला जलपणींचा वेढा सोडविण्यासाठी नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनी जेसीबीच्या साह्याने नदीपात्रातील जलपर्णी काढून टाकली. त्यामुळे नदी वाहती झाली. या स्वच्छता मोहिमेत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *