१९९४ मध्ये लातूर येथे झालेल्या भूकंपात गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली. अशा वेळी त्या भूकंपग्रस्तांना आपण मदत केली पाहिजे, या विचाराने भाऊंनी मोशीतील सहकार्यांना एकत्र केले आणि लातूर येथे मदतकार्यासाठी पोहोचले. भूकंपग्रस्त गावांमध्ये मदतनिधी फेरी काढली. तसेच भूकंपपीडित हरेगाव, सास्तुर निंबाळा, किल्लारी याठिकाणी चार दिवस प्रत्यक्ष मदतकार्य करून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वस्तू बाहेर काढण्यास मदत केली. तसेच भूकंपग्रस्तांना आर्थिक मदतही केली.
धनंजयभाऊ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिविर घेतले जाते. याशिवाय हाडांचा ठिसूळपणा तपासणी व उपचार शिबिर, हिमोग्लोबीन, रक्तगट तपासणी शिबिरांचे आयोजनही केले जाते. डेंग्यू, स्वाईन फ्लू. हिवताप, मलेरिया अशा आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रसिद्धीपत्रके काढून साथीच्या आजारांविषयी प्रबोधन करण्याचे कामही सातत्याने होत असते.
0 Comments