॥ वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें ॥

भौतिक सुखासाठी माणसाने झाडे तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्याचा परिणाम आता सर्वच जिवांना बसू लागला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी नगरसेवक धनंजय आल्हाट आपल्या मित्र परिवार, कार्यकर्त्यांना, नागरिकांना बरोबर घेऊन श्रीनागेश्वर विद्यालय व परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवित असतात. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आयुक्त श्रीकर परदेशी, गटनेता सुलभाताई उबाळे, नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट तसेच पोलिस अधिकारी यांच्या हस्ते इंद्रायणी नदी परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले आहे.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *