मुरूम चोरी प्रकरणात खासदारांनी घातले लक्ष
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट गावांपैकी एक मोशी गाव. या गावाजवळील खंडोबाचा डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात गौणखनिज उत्खनन होत असल्यामुळे हा डोंगर अक्षरश: बोडका झाला होता. पक्ष्यांसाठी नंदनवन, सफारी पार्कसाठी उपयुक्त जागा म्हणून हिरवाई नटलेला खंडोबाचा डोंगर येथे पर्यटनस्थ विकसित करता येणे शक्य होते. मात्र, शासनाच्या गलथान कारभारामुळे बादलेल्या मुरुम चोरीमुळे हा परिसर बकाल झाला होता. येथील गायरान व खंडोबाचा डोंगर परिसरातील मुरुम चोरी शिवसेनेच्या गटनेत्या सुलभाताई उबाळे आणि स्थानिक कार्यकर्ते धनंजयभाऊ आल्हाट यांनी उपडकीस आणली आणि १२ ट्रक व एक जेसीबी पकडून मोशीच्या तत्कालीन तलाठी राजश्री वाघमारे यांच्या ताब्यात दिला होता. या पार्श्वभूमीवर धनंजयभाऊ आल्हाट यांनी आंदोलन उभारले. या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत खंडोबाचा डोंगर व गायरान परिसरातील मुरुम चोरीला आळा घातला. त्यामुळे खंडोबाचा डोंगर वाचविण्यात यश आले.
भष्टाचारमुक्त जन आंदोलनास जाहीर पाठींब
ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयक मंजुरीसाठी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धनंजयभाऊ आल्हाट यांनी मोशीतील तरुण व महिलांना एकत्र करून उत्स्फूर्त मोर्चा काढला. तसेच अटकेसंदर्भात विशेष सभा घेतली.

0 Comments