मोशी गावचे ग्रामदैवत म्हणजे श्री नागेश्वर महाराज. भंडाऱ्याचा उत्सव अनेक वर्षांपासून गावच्या मध्यभागी असलेल्या बस टर्मिनल या जागेवर होत असतो. या जागेवरील बस टर्मिनलचे आरक्षण रद्द करून त्यावर खेळाच्या मैदानासाठीचे आरक्षण टाकल्यास मुलांना खेळण्यासाठी तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी ते वापरता येणे शक्य आहे. यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. महापालिकेतील जकात नाके रद्द झाल्यामुळे मोशी येथील आरक्षण क्रमांक १/१७० जकात नाक्यासाठी १.६० हेक्टर क्षेत्र आरक्षित असून या आरक्षणातील ०.७५ आर महापालिकेच्या ताब्यात आले असून उर्वरीत क्षेत्र टर्मिनलची जागा गावच्या मध्यभागी व श्री नागेश्वर महाराज समाधीच्या बाजूला असल्यामुळे जकात नाक्याची ताब्यात आलेल्या आरक्षण क्रमांक १/ १७० मधील जागेत हे आरक्षण स्थलांतरीत करावे किंवा रद्द करून खेळाच्या मैदानासाठीचे आरक्षण प्रस्तावित करण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला. सध्या याच जागेवर श्री नागेश्वर महाराजांचा भंडारा उत्सव ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.
Categories: अध्यात्मिकविकासकामे
0 Comments