५ वर्षांपूर्वी मोशी भागात मुख्य व अंतर्गत रस्त्यावर तसेच जागोजागी कचराकुंडी, कचऱ्याचे ढीग अवास्तव पसरलेले दिसत होते. सध्यस्थितीत हे चित्र पुर्णपणे बदलले असून विद्रुपिकरण दुर झाले आहे. सध्या घरोघरी कचरा बेचक गाडी कचरा गोळा करण्यासाठी जात आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असुन कचरामुक्त मोशी झाली आहे.
पूर्व स्थितीचे चित्र
गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीचा फटका महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना बसला होता. या पार्श्वभूमीवर सकाळ वृत्तपत्र समूहाने जलअभियान राबविले होते. पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या जलदिंडीमध्ये शालेय विद्यार्थ्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी सहभागी झाली होती. वाजत-गाजत काढण्यात आलेल्या या जलदिंडीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटिल, गटनेत्या सुलभाताई उबाळे, नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनी आपल्या कार्यकर्त्यासह सहभागी होऊन नागरिकांना पाणीबचतीचा संदेश दिला.

0 Comments