प्रशासनाच्या कारभारात जनतेला प्रत्यक्ष हस्तक्षेप, लक्ष घालता येत नसले तरी आता त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. सरकारी कारभाराबाबत जाणून घेण्याचा अधिकार ‘माहिती अधिकाराने’ सामान्यांना दिला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २००१ मध्ये माहिती अधिकाराबाबत जनआंदोलन उभारून शासनाला याची दखल घ्यायला भाग पाडले होते. त्यानंतर २००५ मध्ये हा कायदा लागू झाला. काय आहे हा कायदा? याविषयी सर्वसामान्यांना माहिती व्हावी, यासाठी नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून या कायद्याविषयी जनजागृतीचे काम केले.
0 Comments