कचरा डेपोविरोधात उभारले…दुर्गंधीपासून मिळाली सुटका
• आदर्शनगरमधील ८१ एकर जागेतील कचरा डेपोमुळे आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कचरा डेपो स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी आहे. मात्र आता पुणे महापालिकेचा उरुळी येथील कचरा मोशी वाणीत जिरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धनंजय आल्हाट यांनी ३ नोव्हेंबर २०१४ रोजी प्रशासनाला निवेदन सादर केले.
• विकास आराखड्यानुसार या जागेत सफारी पार्कचे आरक्षण आहे. परंतु आरक्षणात बदल करून कचरा डेपो उभारण्यात आला. यासाठी कचरा डेपो हटाव कृती समिती व सुजाण नागरिक मंचच्या माध्यमातून कचरा डेपो हटाव आंदोलन उभारले.
• महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे, नगरविकास मंत्री, आरोग्य मंत्री व मुख्यमंत्री यांना अभ्यासपूर्ण निवेदने सादर केले असुन हा ला उस न्यायालयात पोहोचला आहे.


0 Comments